नवी दिल्ली : भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.
एका वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय. 'इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन वूमन' या संघटनेनं इतर दोन संस्थांसोबत मिळून हा अभ्यास समोर सादर केलाय.
या अभ्यासात जवळपास २४.५ टक्के भारतीय पुरुष कोणत्या ना कोणत्या लैंगिक हिंसेत सहभागी होताना दिसतात. यातील बहुतांश जणांनी आपल्या लैंगिक साथीदारांसोबत हिंसक कृत्य केलेत.
रवांडा, मॅक्सिको, क्रोएशिया आणि चिली यांसारख्या देशांच्या तुलनेत या प्रकारच्या लैंगिक हिंसेमध्ये भारत खूप पुढे आहे. भारतीय तरुणांमध्ये छेडछाड आणि लैंगिक दुर्व्यवहार तसंच लैंगिक आक्रमकता सर्वात जास्त प्रमाणात आढळलीय. बलात्कारांसारख्या घटनांसाठी प्रवृत्त करण्यासाठी अल्कोहोलचं सेवनंही कारणीभूत आहे.
या अभ्यासासाठी भारताच्या दिल्ली, विजयवाड शहरांतील १८ ते ५९ वर्षांच्या जवळपास २००० तरुणांचा अभ्यास केला गेला. यासर्वांना बलात्कार, सामूहिक बलात्कार, अल्कोहोलचं सेवन यांबद्दल त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले.
राष्ट्रीय अपराध ब्युरोच्या आकड्यांनुसार भारतात दररोज जवळपास ९० महिला बलात्काराच्या बळी ठरतात. भारतात पती आणि वडीलच इतर कोणत्याही व्यक्तीच्या तुलनेत अधिक लैंगिक अपराध करताना आढळतात, असंही यात म्हटलं गेलंय.
बलात्काराच्या घटना आणि लैंगिक हिंसा कमी करण्यासाठी शाळेतील मुलांना लैंगिक संवेदनशीलता आणि अहिंसक जीवनशैलीची शिकवण दिली जावी, असंही यात म्हटलं गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.