क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांना "नो ऑटोग्राफ"

क्रिकेटमध्ये होणारी स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सामना सुरू असतांना प्रेक्षकांना खेळांडूनी ऑटोग्राफ देण्यास बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय, तसे आदेशही खेळाडूंना देण्यात आले आहे.

Updated: Mar 9, 2015, 02:46 PM IST
क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांना "नो ऑटोग्राफ"

मुंबई : क्रिकेटमध्ये होणारी स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सामना सुरू असतांना प्रेक्षकांना खेळांडूनी ऑटोग्राफ देण्यास बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय, तसे आदेशही खेळाडूंना देण्यात आले आहे.

आयपीएल मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगमुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती.  त्यामुळे  फिक्सिंगला रोख लावण्यासाठी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रयत्न सुरू होते. सामना सुरू असतांना बुकींचे एजंट मैदानात उपस्तित असतात, त्यामुळे ते ऑटोग्राफच्या बहाण्याने खेळाडूंशी संपर्क साधू शकतात. 

यावर सावधगिरी म्हणून ऑटोग्राफवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. ऑटोग्राफ बंदी सर्वच देशांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे माधवन यांनी सांगितले.