www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन झालंय. त्या ७५ वर्षांच्या होत्या. विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी लहानपणापासून चंदेरी पडदा गाजवायला सुरुवात केली.
मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरू अशा अनेक चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री म्हणूनही अनेक हिंदी फिल्म गाजवल्या. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला.
१९६५पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली. १९५७मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं.
राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.