www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला `ये जवानी है दिवानी` सिनेमावर नाराज झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी या सिनेमाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या सिनेमात मनालीच्या नावाखाली काश्मिरमधील गुलमर्गमध्ये शुटिंग करण्यात आलं आहे. या गोष्टीचा ओमर अब्दुल्ला यांना राग आला आहे. या सिनेमासाठी गुलमर्ग येथे शुटिंग करण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी सहाय्य करूनही सिनेमात गुलमर्गचा उल्लेख मनाली असा केल्याने ओमर अब्दुल्ला संतप्त झाले आहेत.
ओमर अब्दुल्लांना याही गोष्टीची सविस्तर माहिती हवी आहे, की निर्माता करण जोहरने शुटिंगसाठी गुलमर्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याला श्रेय दिलं आहे की नाही? ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्या ट्विचमध्ये यासंदर्भात वाचकांना आवाहन केलं आहे की काश्मिर श्रेय दिल्याचं जर तुम्हाला एखाद्या सीनमध्ये दिसलं, तर मला कळवा.
काश्मिरचं सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक मनालीला जाण्याच्या योजना आखत आहेत. त्यांना माहिती असायला हवं, की जे सौंदर्य मनालीच्या नावाने सिनेमात दाखवलं आहे, ते सौंदर्य, बर्फ गुलमर्ग, काश्मिरमधील आहे, असं समजून पर्यटक मनालीला जात आहेत. यामुळे काश्मिरचं नुकसान होत असल्याचं ओमर अब्दुल्ला यांना वाटत आहे. जेव्हा गुलमर्गला ये जवानी है दिवानीचं शुटिंग सुरू होतं, तेव्हा स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातीने हजर होते. अशा वेळी काश्मिरला त्याच्या सौंदर्याचं श्रेय न देणं, हे ओमर अब्दुल्ला यांना खूपच अपमानास्पद वाटलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.