दीपिका शाहरुख खानवर संतापली!

अभिनेत्री दीपिका पदुकोणला बॉलिवूडमध्ये आणलं ते शाहरुख खानने. मात्र सध्या दीपिका शाहरुख खानवरच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुख खानने ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दीपिका पदुकोणच्या रणवीर सिंगसोबत असणाऱ्या प्रेम संबंधांबद्दल केलेल्या शेरेबाजीमुळे दीपिकाला शाहरुखचा राग आल्याचं बोललं जात आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 7, 2013, 07:24 PM IST

www.24taas.com,मुंबई
अभिनेत्री दीपिका पदुकोणला बॉलिवूडमध्ये आणलं ते शाहरुख खानने. मात्र सध्या दीपिका शाहरुख खानवरच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुख खानने ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दीपिका पदुकोणच्या रणवीर सिंगसोबत असणाऱ्या प्रेम संबंधांबद्दल केलेल्या शेरेबाजीमुळे दीपिकाला शाहरुखचा राग आल्याचं बोललं जात आहे.
सध्या दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबत रोहीत शेट्टीचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा करत आहे. तर रणवीर सिंग बरोबर संजय लीला भन्सालीचा ‘रामलीला’ हा सिनेमाही करत आहे. ‘रामलीला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दीपिका आणि रणवीर सिंग यांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये पसरल्या आहेत. रणवीर सिंगने दीपिकावरील आपलं प्रेम खुल्लम खुल्ला जाहीर केलं आहे. तर दोघांचे किस करतानाचे फोटोही इंटरनेटवर प्रसिद्ध झाले आहेत. दीपिका पदुकोणच्या याच अफेअरबद्दल ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या शुटिंगदरम्यान शाहरुख खानने शेरेबाजी केली. या गोष्टीचा दीपिकाला कमालीचा राग आला.

शाहरुख खानला दीपिका पदुकोण काही बोलू शकली नाही. पण, तिने आपली नाराजी गप्प राहूनच जाहीर केली. काही वेळाने शाहरुख खानने दीपिकाची माफी मागितली. दीपिका पदुकोण हिचं रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्ल्या यांच्यासोबतही अफेअर होतं. मात्र रणवीर सिंगसोबत असलेल्या तिच्या अफेअरबद्दल ती बोलण्यास नकार देत आहे.