मुंबई : जाणून घ्या, अशा ५ गोष्टी ज्यापासून दूर राहणे फायद्याचे ठरू शकते. आपण कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे या संदर्भात शास्त्रामध्ये काही उदाहरण आहेत.
मोह जेव्हा वाढतो तेव्हा बुद्धीचा वापर कमी होतो, मोह मनुष्याला पुढे जाऊ देत नाहीत, मोहामुळे योग्य अयोग्य यातील अंतर आपण ओळखू शकत नाही.
स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ समजणे म्हणजे अहंकार. ते जीवनात कधीही यश प्राप्त करू शकत नाहीत, जे लोक फक्त मीपणा आणि अहंपणामध्ये जगतात. अहंपणाची भावना व्यक्तीच्या पतनाचे कारण ठरते.
अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान नेहमी अडचणी निर्माण करते. यामुळे व्यक्तीने नेहमी ज्ञान अर्जित करत राहावे. एखाद्या विषयाची जास्तीच जास्त माहिती असल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट कामामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्या कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
जे लोक या क्रोधावर नियंत्रण मिळवतात त्यांना निकट भविष्यातील कामामध्ये यश अवश्य मिळते. याउलट जे लोक क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, ते आवेशात येउन चुकीचे काम करतात जर एखाद्या व्यक्तीच्या मानतील गोष्ट पूर्ण झाली नाही तर त्याला राग येणे स्वाभाविक आहे.
प्रत्येक क्षणी स्वतःला असुरक्षित समजतात आणि स्वतःला सुरक्षित करण्याच्या विचारात राहतात. ज्या लोकांच्या मनामध्ये असुरक्षेची भावना असते, ते कोणतेही कार्य एकाग्रतेने पूर्ण करू शकत नाहीत.