मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी, नांदेड, परभणी आणि जालनाचा दौरा करणार आहेत.
आपल्या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून जमलेला निधी ते एक हजार दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. प्रत्येकी एक शेळी आणि दोन पिल्लं अशी दुभती जनावरं आणि रोख १० हजार रुपये असा हा मदतनिधी असणार आहे.
दरम्यान, शिवसेना मंत्री आमदारांचं पथक शनिवारी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतं. वेगवेगळ्या भागात फिरून या लोकप्रतिनिधींनी दुष्काळासोबतच शासनानं राबवलेल्या योजनांची माहिती घेतली. मात्र हा राज्य सरकारवरचा अविश्वास नसल्याचा खुलासाही, या निमित्तानं केला गेला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.