टीम इंडिया का 'अरमान'

मुंबईच्या अरमान जाफरने भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिलाय. त्यानं लहान वयातच ४९८ रन्सची विक्रमी खेळी करताना सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं. मुंबईचा हा क्रिकेटपटू भविष्यात भारतीय टीममध्ये दिसला तर फारसं आश्चर्य वाटायला नको.

Updated: Dec 17, 2011, 03:01 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईच्या अरमान जाफरने भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिलाय. त्यानं लहान वयातच ४९८ रन्सची विक्रमी खेळी करताना सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं. मुंबईचा हा क्रिकेटपटू भविष्यात भारतीय टीममध्ये दिसला तर फारसं आश्चर्य वाटायला नको.

इंटरस्कूल टूर्नामेंट गाईल्स शिल्डमध्ये रिझवी स्प्रिंगफिल्ड स्कुलच्या अरमान जाफरने नवा रेकाँर्ड केला. अरमाननं परिक्षित वळसणकरचा ३६६ रन्सचा रेकाँर्ड मोडत एका इंनिंगमध्ये ४९८ रन्स ठोकलेत. अरमानने ४९० बाँल्समध्ये ७७ फोरच्या मदतीने ४९८ रन्सची ही धुवाधार खेळी केली आहे.तब्बल ५०० मिनिटे पिचवर उभ्या ठाकलेल्या अरमानचं केवळ २ रन्ससाठी पंचशतक हुकलं. अरमानच्या या लाजबाब खेळीन संपूर्ण क्रिकेट जगाचं लक्ष वेधून घेतलं.

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अरमाननं आतापर्यंतची वाटचाल यशस्वी ठरलीय. त्याच्यातील गुणवत्ता पाहता अनेक दिग्गजांना त्याला टीम इंडियाकडून खेळताना पाहयचंय.