मध्यपूर्वेतील देशांमध्ये आता ह्युमनोईड रोबोट वापर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. ह्युमनोईड रोबोटच्या वापरामुळे शास्त्र आणि गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रक्रियेत क्रांतीकारक बदल घडवतील. अल्डबरन रोबोलिटक्स ही फ्रेंच कंपनी इंटेलबरोबर भागीदारीत ह्युमनोईड रोबोटचा मध्यपूर्वेतील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक प्रक्रियेत परिणामकारक वापर करता येतो हे दाखवून दिलं.
शास्त्र, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितांच्या विद्यार्थ्यांना इंटेल ऍटोम तंत्रज्ञानाचं पाठबळ लाभलेला नाओ या पहिल्या ह्युमनोईड रोबोटचा वापर उपयुक्त शैक्षणिक साधन म्हणून होणार आहे. नाओ हा वापरण्यास सोपा, आणि कोरिग्राफ सॉफ्टवेअर तसंच थ्री डी सिम्युलेटर आणि असंख्य प्रोग्रामिंग इंटरफेसने सज्ज आहे.
साधारणता दहा वर्षांपूर्वी संगणकांचा उपयोग शैक्षणिक प्रक्रियेसाठी होऊ शकेल यावर लोकांचा विश्वास नव्हता. आज २१ व्या शतकातील क्लासरुमध्ये तंत्रज्ञानाच्या वैविध्याने ते साध्य झालं आहे. येत्या काही वर्षात क्लासरुम्समध्ये संगणका बरोबर रोबोटही तितकेच महत्वाचे ठरणार आहेत. भविष्यातील अभियंते, शास्त्रज्ञ आणि उपयोजित शास्त्र शाखेतील संशोधकांना रोबोट विषयी आणि रोबोटच्या माध्यमातून शिकण्याचा लाभ होणार आहे.