www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 134 अंशांवर बंद झाला. त्यात फक्त 3 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 190 अंशांवर बंद झाला. त्यात फक्त दीड अंशांची वाढ झाली. आज सकाळी बाजार वरच्या पातळीवर खुला झाला. त्यानंतर काही वेळातच घट दिसून आली.
सकाळच्या सत्रात बाजारात वाढ दिसून आली. पण दुपारच्या सत्रात बाजारात पुन्हा घसरण झाली. आणि शेवटी बाजार किंचित वरच्या पातळीवर बंद झाला. केंद्रीय मंत्रीमंडळानं बॅकीग दुरूस्ती विधेयकाला मंजूरी दिल्याच्या वृत्तानंतर बॅकांचे स्टॉक्स तेजीत होते. तिमाही अहवालात महसुलात चांगली वाढ झाल्यामुळे आयडीया सेल्युलरचे स्टॉक्स वाढलेले होते. यावर्षी सलग तिस-यांदा पाऊस समाधानकारक असेल अशी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुखांनी जाहीर केल्यानंतर एफएमसीजी म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्याचे शेअर्स तेजीत होते. त्यापैकी सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसीनं उच्चांकाची नोंद केली.
आरबीआयन रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे बॅकांकडून कार लोनवरचे व्याजदर कमी करण्याच्या शक्यतेमुळे एटो स्टॉक्सची तेजी कायम होती. रियॅलिटी आणि भांडवली उत्पादक कंपन्यांचे स्टॉक्सच्या किंमती मोठया प्रमाणात घसरल्यामुळे आज त्यांची खरेदीही मोठया प्रमाणावर वाढली होती. आज आयसीआयसीआय बॅक, हिंडाल्को, गेल, इन्फोसिस, टीसीएस या टॉप पाच कंपन्या तेजीत होत्या तर कोल इंडिया, एसबीआय, भेल, बजाज एटो, जिंदाल स्टील या टॉप पाच कंपन्या मंदीत होत्या.