झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणात बदल करणार - मुख्यमंत्री

राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणुकदारांसाठी पुरक असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

Updated: Sep 21, 2017, 11:30 PM IST
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणात बदल करणार - मुख्यमंत्री   title=

मुंबई  : राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणुकदारांसाठी पुरक असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री येथील हॉटेल ट्रायडेंट येथे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट फाँउडेशनतर्फे आयोजित गुंतवणूकदारांच्या संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे देशातील अन्य राज्यांपेक्षा आर्थिक गुंतवणुकीसाठी उपयुक्त राज्य आहे. नीती आयोग आणि जागतीक बँकेने महाराष्ट्राचे कौतुक केले.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अनेक मोठ मोठे प्रकल्प सुरु आहेत. भूमिगत मेट्रो रेल्वेचा प्रकल्प चार वर्षात पूर्ण होणार असून, त्याचा उपयोग जलद वाहतुकीसाठी होईल. रेल्वेची क्षमता दररोज सात लाख प्रवासी वाहून नेण्याची आहे. मेट्रो सुरु झाल्यावर हीच क्षमता नऊ लाखावर जाईल. एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे आणखी चार लाख प्रवाशांची सोय होईल, असे ते म्हणालेत.

तसेच मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या सी-ब्रीजचे काम लवकरच सुरु होणार आहे. हा पुल झाल्यावर प्रवाशांना मुंबईतून नवी मुंबईला जाण्यासाठी फक्त 20 मिनीटे लागतील. बांद्रा ते वर्सोवा सि-लिंकचे कामही लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे, ते म्हणालेत.