"...अन् ते वर्तुळ पूर्ण झालं'; रतन टाटांचा खास मित्र शांतनु नायडुला मिळाली मोठी जबाबदारी, त्याची पोस्ट पाहाच

रतन टाटा यांच्या निधनानंतर चार महिन्यांनी, त्यांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये एक महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. शंतनूने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 5, 2025, 10:00 AM IST
"...अन् ते वर्तुळ पूर्ण झालं'; रतन टाटांचा खास मित्र शांतनु नायडुला मिळाली मोठी जबाबदारी, त्याची पोस्ट पाहाच title=

9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण व्यावसायिक जगात शोककळा पसरली. रतन टाटांच्या व्यावसायिक आणि खासगी जीवनात जवळचा मित्र म्हणून शातनू नायडूचा मोठा आधार होता. शांतनू हा त्याचा खूप जवळचा आणि खास मित्र असल्याचेही म्हटले जाते. रतन टाटा गेल्यानंतर चार महिन्यांनी, शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली. शंतनूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

शांतनुची खास पोस्ट 

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना शांतनू यांनी लिहिले की, "मला तुम्हाला कळवताना आनंद होत आहे की, ''मी टाटा मोटर्समध्ये नवीन पद स्वीकारत आहे. मला आठवते जेव्हा माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढऱ्या शर्ट आणि नेव्ही पँटमध्ये घरी परतायचे आणि मी खिडकीजवळ त्यांची वाट पाहत असे. हे वर्तुळ पूर्ण झालं आहे.'' रतन टाटांचे सर्वात जवळचे सहकारी असलेले शांतनू नायडू यांना टाटा मोटर्सच्या जनरल मॅनेजर, हेड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजची जबाबदारी देण्यात आली आहे." याआधी त्यांनी गुडफेलोज नावाचा एक उपक्रम सुरू केला होता ज्यामध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली होती.

शांतनूने पुस्तकात केलं वर्णन 

शांतनू नायडू यांचा जन्म 1993 मध्ये एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवून शैक्षणिक प्रवास सुरू केला आणि नंतर कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली. 2018 मध्ये, शांतनूने रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, जिथे त्यांनी रतन टाटांसोबत अनेक प्रकल्पांवर काम केले. रतन टाटा यांनी भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी एक नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित केली तेव्हा त्यांचे शांतनूशी असलेले नाते अधिक घट्ट झाले. शंतनूच्या या प्रकल्पात रतन टाटांनी गुंतवणूक केली, ज्यामुळे प्रकल्प पुढे सरकला. हे सहकार्य शांतनूसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता, कारण रतन टाटा यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. शांतनू नायडू यांनी त्यांच्या "आय कॅम अपॉन अ लाईटहाऊस" या पुस्तकात रतन टाटांसोबतचे त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

शांतनूचा जन्म तेलुगू कुटुंबात 

शंतनूचा जन्म 1993 मध्ये पुण्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. रतन टाटांप्रमाणेच तो समाजाप्रती खूप संवेदनशील आहेत. समाजसेवेसोबतच शांतनूला प्राण्यांवरही खूप प्रेम आहे. शांतनूने रस्त्यावरील श्वानांची सेवा करण्यासाठी मोटोपॉज नावाची एक संस्था देखील स्थापन केली आहे. रतन टाटा मोटोपॉजच्या मोहिमेने खूप प्रभावित झाले होते ज्या अंतर्गत ते रस्त्यावरील प्राण्यांसाठी डेनिम कॉलर बनवत होते आणि त्यांना ते घालायला लावत होते. या कॉलरमध्ये रिफ्लेक्टर होते, ज्यामुळे अपघात कमी झाले.

यामुळे शांतनू रतन टाटांच्या संपर्कात

मिळालेल्या माहितीनुसार, शांतनूच्या प्राण्यांवरील आणि श्वानांवरच्या प्रेमाने रतन टाटा यांचे लक्ष वेधले आणि टाटांनी त्यांना मुंबईत बोलावले. असे मानले जाते की येथूनच रतन टाटा आणि शांतनू यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली. अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर नायडू यांना आरएनटी कार्यालयात नोकरी मिळाली. टाटांसाठी अनेक कारभार सांभाळण्याव्यतिरिक्त, नायडू यांनी सामाजिकदृष्ट्या संबंधित व्यासपीठांची स्थापना करणे सुरू ठेवले.