कपिल शर्मा आता पुन्हा घेऊन येत आहे कॉमेडीचा नवा धमाका; 'कोल्डप्ले' सुद्धा सहभागी होण्याची चर्चा

प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा तिसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश म्यूजिक बँड 'कोल्डप्ले (Coldplay)' सुद्धा कार्यक्रमात सहभागी होण्याची चर्चा रंगू लागली आहे. 

Updated: Feb 5, 2025, 11:47 AM IST
कपिल शर्मा आता पुन्हा घेऊन येत आहे कॉमेडीचा नवा धमाका; 'कोल्डप्ले' सुद्धा सहभागी होण्याची चर्चा title=

The Great Indian Kapil Show Season 3: आपल्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. चाहत्यांच्या आणि रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळे कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाच्या दोन्ही सीझन्सना भरभरुन प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असलेल्या या शोचा तिसरा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

कपिल शर्माने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना कपिलने काही मजेशीर किस्से शेअर केले आणि कार्यक्रमातील आगामी भागांबद्दल प्रेक्षकांना काही हिंट्स सुद्धा दिल्या. ब्रिटिश म्यूजिक बँड 'कोल्डप्ले (Coldplay)' यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची इच्छा असल्याचे सांगितले. संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या या म्यूजिक बँडने भारतात बरेच कॉन्सर्ट्स केले आहेत. 

भारतात 'कोल्डप्ले (Coldplay)' चा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यावेळी कपिलने विनोदी पद्धतीने सांगितले की, "आम्ही शोच्या निर्मात्यांना सांगत होतो की, सेट वर्षभर ठेवा. लोक कोल्डप्लेची तिकिटे विकत घेत आहेत आणि तुमचा विश्वास बसणार नाही की 'आम्हाला त्यांच्याकडून तुमच्या शोमध्ये यायचे आहे', असे ईमेल येत होते. " कपिलने केलेल्या कार्यक्रमाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये सुद्धा खूप उत्साह पाहायला मिळत आहे. चाहते या कार्यक्रमाच्या सीझन 3 ची आतुरतेने वाट पाहत असल्याचं प्रतिक्रियांवरुन समोर येत आहेत. 

कपिलच्या कार्यक्रमात येण्याची कोल्डप्ले यांची इच्छा

यासोबतच नेटफ्लिक्स वर सुद्धा कपिल शर्मा शोची टीम आता कॉमेडीचा तिप्पट धमाका घेऊन येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये मनीष पॉल कपिलला विचारतो, 'जर सीझन 3 येत असेल तर यावेळी नवीन काय असेल?'. यावर कपिल गमतीने म्हणतो, 'सीझन 3 तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी तो आणखी एक एपिसोड आहे. आम्हाला 200 एपिसोड्स एकत्र करण्याची सवय आहे. यानंतर कपिल सुनीलकडे बोट दाखवत हसत म्हणाला, 'जोपर्यंत आमच्यातच वाद होत नाही तोपर्यंत आमचा शो थांबणार नाही'.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

सीझन 3 ची गंमतीशीर पद्धतीत घोषणा

काही वर्षांपूर्वी कपिल आणि सुनीलमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता, यानंतर सुनीलने शो सोडला होता. याबाबतीत बऱ्याचजणांना माहित आहे. सुनीलने कार्यक्रमात साकारलेल्या गुत्थी आणि डॉ. मशूर गुलाटी या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. हीच पात्रे पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. आता दोघांमधील तो वाद मिटला असून ते पुन्हा एकत्र दिसत आहेत. नेटफ्लिक्सवरील त्यांचा शो हीट झाला आणि आता कपिल आणि त्याची संपूर्ण टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

कपिल शर्माचा शो येणार प्रेक्षकांच्या भेटीस

कपिल शर्माच्या टीममध्ये सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर, भारती सिंग आणि राजीव ठाकूर यांसारखे अनेक सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. तसेच नेहमीप्रमाणे, अर्चना पूरण सिंह या परिक्षक म्हणून खुर्चीवर दिसतील. या सर्वांच्या मेहनतीने आणि कामामुळे कार्यक्रम पुन्हा धूमाकुळ घालणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. आता 'कोल्डप्ले' खरंच या शोमध्ये सहभागी होतील का? आणि आगामी शोमध्ये पाहुणे कोण असतील? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.