मुंबई : ओला, उबेरच्या संपावर आज १२ व्या दिवशी रात्री उशिरा तोडगा निघाला. या संप मागे घेण्याचा आलाय. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपाचा तिढा सोडवण्यात आलाय. ओला, उबेर चालकांनी पुकारलेला संप आज मागे घेतला. दरम्यान, १५ नोव्हेंबर पुन्हा बैठक होणार आहे. जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा या टॅक्सी टालकांनी दिलाय.
ओला, उबेर व्यवस्थापनाशी त्यांच्या कार्यालयात संघटनांची बैठक होणार होती. परंतु कंपन्यांचे प्रतिनिधी फिरकले नाही. त्यामुळे होणारी चर्चा झालीच नाही. पर्यारी संप सुरूच होता. ओला, उबरच्या चालकांनी तोडगा निघाला नाही, तर मंत्रालयावर आणि मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून ओला, उबर चालक बेमुदत संपावर गेले होते.
- १५ नोव्हेंबरपर्यंत ओला उबेर चालकांना जास्त उत्पन्न मिळावे म्हणून विशेष योजना लागू करणार
- ओला उबेरकडून पेट्रोल-डिझेलच्या दराशी सुसंगत दर चालकाला देण्याचे मान्य
- हे नवे दर ठरवून ओला उबेर आणि संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आणि अंतिम करणार
- पुढील बैठकीत ओला उबेरने ठरवलेले दर मान्य झाले नाहीत तर पुन्हा संपावर जाण्याचा इशारा
- नवे दर ठरवण्याबाबत पुढील बैठक १५ नोव्हेंबरला होणार