Mumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!

Mumbai Pune Expressway: महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2025, 05:29 PM IST
Mumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या! title=
पनवेल एक्झीट मार्ग

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल एक्झिटसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ऐनवेळी होणारा खोळंबा टाळण्यासाठी ही संपूर्ण माहिती वाचा. पुढील 6 महिने वाहतुकीत मोठा बदल तुम्हाला दिसणार आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उडड्राणपुल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होणयाची शक्यता आहे. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा मार्ग 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  

त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या (हलकी व जड अवजड वाहने) वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पनवेल एक्झीट हा मार्ग पुढील 6 महिने बंद राहील. 

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतचे नोटिफिेकेशन जाहीर केले आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काय?

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. 9.600) येथे डावीकडे वळण घेवून एनएच 48 मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण- शिळफाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोलपंप उडड्राणपुलाखालून उजवीकडे वळण घेवून रोडपाली येथून एन.एच 48 महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.