Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अ‍ॅप; तुम्ही ओळखलतं का?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.   

Intern | Updated: Feb 11, 2025, 12:00 PM IST
Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अ‍ॅप; तुम्ही ओळखलतं का?  title=

Guess This Actress: या अभिनेत्रीने चित्रपट कारकिर्दीतील यशाच्या बरोबरीने, एक अ‍ॅपही तयार केले होते. ज्यामुळे ती अनेक आयफोन वापरकर्त्यांना मदत करू शकेल. हे अ‍ॅप तिने त्याच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणातच तयार केले. या अ‍ॅपचे नाव 'फॉन्टस्वॅप' होते आणि ते आयफोन वापरकर्त्यांसाठी खास तयार करण्यात आले होते. ही अभिनेत्री आहे बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री तापसी पन्नू. तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले. ही अभिनेत्री अभिनयातचं नाही तर शिक्षणातही खूप हुशार आहे. 

तापसीचा अ‍ॅप: 'फॉन्टस्वॅप'
तिने तिच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंगच्या अंतिम वर्षात 'फॉन्टस्वॅप' नावाचा अ‍ॅप तयार केला होता. हा अ‍ॅप आयफोन वापरकर्त्यांना त्यांच्या फोनच्या फॉन्ट्समध्ये विविध बदल करण्याची सुविधा देत होता, ज्यामुळे त्यांना एक वेगळा अनुभव मिळावा. तिने एका मुलाखतीत सांगितले की, 'सहा ते सात वर्षांपूर्वी अशा प्रकारचे अ‍ॅप्स खूपच कमी होते आणि ते एकमेव अ‍ॅप होते.' परंतु अ‍ॅप मंजुरीसाठी लागणारी लांब प्रक्रिया आणि इतर कारणांमुळे तिला ते अ‍ॅप आयफोन अ‍ॅप स्टोअरमध्ये सबमिट करता आले नाही.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शालेय आणि शैक्षणिक जीवनातील तिची हुशारी
तापसीच्या अभिनय क्षेत्रातील यशासोबतच, शालेय जीवनातही ती एक हुशार विद्यार्थिनी होती. दिल्लीतील 'माता जय कौर पब्लिक स्कूल'मधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर, तिने 'गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून इंजिनियरींग केले. त्यातही तिने संगणक विज्ञान शाखेतून इंजिनियरींगची पदवी मिळवली. याव्यतिरिक्त, तिने 'कॅट' परीक्षा देखील दिली होती आणि त्यात 88 टक्के मिळवले होते.  

अशा हुशार विद्यार्थिनीला ग्लॅमर इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये 'गेट गॉर्जियस' शोमध्ये भाग घेतल्यानंतर, तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि तिला तिच्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रियता मिळवली.  

हे ही वाचा: सोनू निगम Live Show मध्ये चाहत्यांवर खेकसला; VIDEO व्हायरल होताच नेटकरी म्हणतात नेमकं काय झालं?

तिच्या चित्रपट कारकीर्दीतील यश  

चित्रपट इंडस्ट्रीत आल्यावरही तिने आपली बुद्धिमत्ता आणि अभिनय कौशल्य दाखवले. तापसी पन्नूने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'पिंक', 'हसीन दिलरुबा', 'सूरमा', 'जुडवा 2' आणि 'बदला' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे. तिच्या अभिनयाने आणि बुद्धिमत्तेने तिने फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्येही एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  

तापसी पन्नू: एक प्रेरणा
तापसी पन्नू एक आदर्श आहे जी नेहमीच आपल्या कामात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहते. तिच्या कामातील मेहनत, हुशारी आणि परिश्रम नेहमीच तिच्या यशात दाखले बनतात. अभिनेत्री असताना, तिने तिच्या शालेय आणि शैक्षणिक जीवनातही दिलेल्या यशाने हे सिद्ध केलं आहे की सौंदर्य आणि बुद्धिमत्ता दोन्ही एकत्र असू शकतात.