विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत

Maharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 12, 2024, 08:15 PM IST
विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती,  मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत title=

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena UBT) एकही मुस्लिम उमेदवार (Muslim Candidate) दिला नव्हता. तरीही मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) ठाकरे गटाकडून मुस्लिम उमदेवार दिले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुस्लिम उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असल्यास उमेदवारी दिली जाणार असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी जाहीर केलंय.

शिवसेनेच्या भूमिकेचं कौतुक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. शिवसेनेनं नेहमीच देशभक्त मुस्लिमांना पाठिंबा दिलाय आणि देशविरोधी मुस्लिमांना विरोध केल्याचं थोरात यांनी म्हटलंय. उध्दव ठाकरे धर्माचा भेद करत नाहीत, चुकीचे वागणारे आणि देश विरोधी मुस्लिमांना विरोध असल्याचे ते नेहमी सांगतात, शिवसेनेच्या भूमिकेचे कौतुक केले पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

मविआमध्ये एमआयएम सहभागी होणार का याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. एमआयएमच्या मविआतल्या समावेशावरून दोन्ही बाजूनं वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. मविआला आम्ही वेळ देत आहोत,मविआने आमच्या प्रस्तावावर विचार करावा,असं आवाहन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलंय. अंबादास दानवे एका वेगळ्या लेवलचे नेते आहेत. ठाकरेंनी सांगावं आम्हाला सोबत घेणार की नाही, अनेक जण सेक्युलर म्हणतात मग शिवसेने सोबत जातात , मग एमआयएमला अछुत का समजता असा सवाल इम्तियाज जलिल यांनी विचारला आहे.

विधानसभेसाठी शिवसेना मेरिटच्या आधारे मुस्लिम उमेदवार देणार अशी घोषणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीय. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनीही केला होता. त्यामुळे आता विधानसभेला मुस्लिम उमेदवारच देण्याची ठाकरेंची रणनीती दिसतेय.