आमदारांना गेटबाहेर जाऊ देऊ नका - मंत्री गिरीश बापट यांनी सोडले आदेश

विधानसभेत आज घडला गमतीदार मात्र सरकारसाठी नामुश्कीचा प्रसंग... विधानसभेत 293 अन्वये चर्चा सूरू असताना  सभागृहात कोरम नव्हता त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यावेळी हा प्रसंग घडला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 6, 2018, 09:27 PM IST
आमदारांना गेटबाहेर जाऊ देऊ नका - मंत्री गिरीश बापट यांनी सोडले आदेश title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभेत आज घडला गमतीदार मात्र सरकारसाठी नामुश्कीचा प्रसंग... विधानसभेत 293 अन्वये चर्चा सूरू असताना  सभागृहात कोरम नव्हता त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यावेळी हा प्रसंग घडला. 

सभागृहात कोरम नसल्याने मग संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची धावपळ सुरू झाली.  खाली येवून आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून बोलावण्यात आलं.

गिरीश बापट सभागृहाबाहेर येऊन पीएना जोरजोरात सांगत होते याला बोलव, त्याला फोन कर, आरे आमदारांना गेटबाहेर जावू देऊ नकोस... 

शेतकरी आणि गारपीट हा विषय सुरू असताना दोन्ही बाजुच्या आमदारांना पकडूनआणून सभागृहात बसवावं लागत होतं.