मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाचे संकट वाढत असल्याने त्यावर भविष्यात काय उपाय-योजना करावयाच्या आणि त्याबाबत नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठक होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. pic.twitter.com/z0Ejq0C7vB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2020
A small virus like Corona is testing us. How can we take the name of Chhatrapati Shivaji Maharaj if we surrender to it? Maharashtra is the land of the braves, warriors and the saints. We will never fall short when it comes to putting up a fight. We will fight and win! pic.twitter.com/ka2I66Q7Mt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 4, 2020
कोरोनाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावून स्वत: गाडी चालवली. मुख्यमंत्री वर्षावर व्हिसीद्वारे बैठक घेत आहेत. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल परब, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत.
Mumbai: Posters declaring a locality, a containment zone was put up last night by BMC after a #COVID19 positive person was found near a Govt guest house. The Govt guest house is located near Matoshree (private residence of Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray). pic.twitter.com/ux1P5BFf2K
— ANI (@ANI) April 7, 2020
महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ५,५३,०२५ मजूर आणि बेघर लोकांना जेवण पुरवण्यात आले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 6, 2020
काही मंत्री मंत्रालयात बैठकीला बसले आहेत, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई, नवाब मलिक, अस्लम शेख आहेत . तर जिल्ह्यात असलेले मंत्री आपापल्या जिल्ह्यात व्हिसीद्वारे बैठकीत सहभागी झाले आहेत. धनंजय मुंडे बीडवरून, अमित देशमुख लातूरवरून, बुलढाण्याहून राजेंद्र शिंगणे असे सर्व मंत्री व्हिसीद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत. १७ मार्चनंतर होतेय मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.