Crime : 8 वर्षांपासून घोडीच्या नशिबी कोर्टाच्या फेऱ्या; कुख्यात गुंड श्याम दाभाडे एन्काऊंटर प्रकरण

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. परंतु कोर्टाची पायरी चढण्याची वेळ थेट एका घोडीवर आली आहे. एका कुख्यात गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांनी या मुक्या प्राण्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे प्रत्येक सुनावणीला घोडीला कोर्टात हेलपाटे मारावे लागत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Updated: Feb 8, 2025, 10:19 PM IST
Crime : 8 वर्षांपासून घोडीच्या नशिबी कोर्टाच्या फेऱ्या; कुख्यात गुंड श्याम दाभाडे एन्काऊंटर प्रकरण title=

Talegaon Shyam Dabhade Encounter Case : शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. परंतु कोर्टाची पायरी चढण्याची वेळ थेट एका घोडीवर आली आहे. एका कुख्यात गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांनी या मुक्या प्राण्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे प्रत्येक सुनावणीला घोडीला कोर्टात हेलपाटे मारावे लागत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

मावळमधली एका घोडी प्रत्येक सुनावणीला कोर्टात जावे लागते. तुम्ही म्हणाल मुक्या प्राण्याची कसली सुनावणी. तर गोष्ट अशीय की मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथं श्याम दाभाडे हा कुख्यात गुंड होता.. त्याने अनेक गुन्हे केलेत.. या गुन्ह्यांमुळेच पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. मात्र, त्यावेळी तो ज्या घोडीवरून रपेट मारत होता त्या घोडीलाही पोलिसांनी आरोपी केलं आणि ताब्यात घेतले. त्यामुळे प्रत्येक सुनावणीला या घोडीला कोर्टाचा हेलपाटा मारावा लागत आहे.

या घोडीचं नाव पिल्लू आहे. या घोडीवरूनच गुंड शाम दाभाडे नेहमीच रपेट मारायचा. मात्र शाम दाभाडेच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी घोडीलाच ताब्यात घेतली. खर तर एखाद्या गुन्ह्यात आरोपीच्या गाड्या, घरं अशी प्रॉपर्टी जमा केली जाते. कालांतराने या प्रॉपर्टीचा पोलीस लिलाव करतात किंवा त्या सरकार जमा होतात. मात्र शाम दाभाडे प्रकरणात थेट पिल्लू नावाची घोडी ताब्यात घेतली गेली. 

मूक जनावर असल्याने पोलिसांना तिचा लिलाव देखील करता येत नाही. त्यामुळ पोलिसांनी या पिल्लू नावाच्या घोडीची मावळ मधील्याच संत तुकाराम महाराज गोशाळा येथे रवानगी केली. 2017 पासून ही पिल्लू घोडी याच गोशाळेत आहे. या घोडीचा सर्व खर्च या गोशाळेचे संचालक रुपेश गराडे करतात.

शाम दाभाडे एन्काऊंटर प्रकरणाला आता 8 वर्ष उलटून गेली आहे. मात्र आजही ज्या दिवशी सुनावणी असते, त्यादिवशी या घोडीला थेट कोर्टात घेऊन जावे लागतं किंवा घोडी व्यवस्थित आहे याची खातरजमा करण्यासाठी कोर्टातून काही लोक पहाणीसाठी येतात. सामान्यता कोर्ट म्हटंल की आपण चार हात लांबचं रोहतो. मात्र या पिल्लू नावाच्या या घोडीच्या नशिबी कोर्टाच्या फेऱ्या मारण्याची वेळ आलीय..