Delhi Election Result 2025 : भाजपसाठी 2025 या वर्षाची सुरुवात जोमात झाली आहे. 2024 वर्षाची अखेर महाराष्ट्रव विजयानं केलेल्या भाजपनं नव्या वर्षातल्या पहिल्याच निवडणुकीत देशाची राजधानी दिल्लीवर आपला झेंडा रोवला आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक पूर्ण बहुमतानं भाजपनं जिंकली आहे.
भाजपनं राजधानी दिल्लीही जिंकली
दिल्लीत 27 वर्षानंतर 'कमळ' फुलले
दिल्ली विधानसभेत भाजपचा दणदणीत विजय
देश जिंकणा-या भाजपनं राजधानी दिल्लीही जिंकलीये. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झालाय. भाजपनं तब्बल 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकलाय. दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपला विजयाचा आत्मविश्नास पाहायला मिळाला. प्रचारातला हा आत्मविश्वास निकालातही दिसला. भाजपनं दिल्लीतल्या प्रचारात विकासाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता. दिल्लीकरांच्या मनात भाजपनं स्थान मिळवल्याचं पाहायला मिळालं. मतमोजणीच्या पहिल्या क्षणापासून ते निकालापर्यंत भाजपनं निकालाच्या प्रत्येक टप्प्यावर वर्चस्व राखलं. 70 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने 48 हून अधिक जागी विजय मिळवला आहे. तर आप पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले.
- आपच्या योजना सुरूच ठेवण्याचं भाजपचं आश्वासन
- महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचं भाजपचं आश्वासन
- 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याचं आश्वासन
- 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयाचा फायदा
-पाणी तुंबणं, पाणीपुरवठा विस्कळीत होणं याचा आपला फटका बसला
या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपचा दणदणीत विजय झाला.
दिल्लीककरांच्या आयुष्यात भाजप नवं परिवर्तन आणणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय. दिल्लीत आपचा पराभव हा अरविंद केजरीवालांच्या अहंकाराचा पराभव असल्याची टीका भाजपनं केलीय. दिल्लीत आपला मोठा विजय मिळतोय म्हटल्यावर दिल्लीकरांनी भाजप मुख्यालयाबाहेर गर्दी केली होती. ढोलताशांच्या निनादात भाजप कार्यकर्ते जल्लोष करत होते. या गर्दीत केजरीवालांच्या वेशभूषेत आलेला भाजप कार्यकर्ता आणि पीके बनून आलेला फिल्मी कार्यकर्ता लक्षवेधी ठरला.
गेली दहा वर्ष भाजपची देशभर सत्ता होती. पण ज्या दिल्लीतून देशाचा कारभार चालवला जात होता त्या दिल्लीत भाजपची सत्ता नव्हती. आता मात्र भाजपचं कमळ दिल्लीतही फुललंय. पुढच्या पाच वर्षांच दिल्लीचा उत्तम कारभार करुन दिल्लीवाल्याचं दिल भाजप जिंकेल अशी आशा आहे.