खुशखबर! मुंबई जवळच स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाची 8 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी

 म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 205 सदनिकांची सोडत काढण्याची घोषणा  केली आहे

Updated: Aug 20, 2021, 02:42 PM IST
खुशखबर! मुंबई जवळच स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाची 8 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी title=

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 205 सदनिकांची सोडत काढण्याची घोषणा  केली आहे. या सोडतीमध्ये आणखी 700 घरांचा समावेश करण्याची तयारी मंडळाने केली आहे.

सोडतीची जाहिरात 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून अर्ज भरण्यास 24 ऑगस्ट पासून होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुंबई ऐवजी ठाण्यात ही सोडत काढण्यात येणार आहे. 

या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6 हजार 195 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 775, मध्यम उत्पन्न गटासाठी 234 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1 अशी एकूण 8 हजार 205 घरांचा समावेश आहे. 

यामध्ये 6 हजार 180 घरे पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. ठाणे जिल्हयातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील घरांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातील आणखी 700 घरांचा समावेश या सोडतीमध्ये करण्याचे  नियोजन कोकण मंडळाने केले आहे.या घरांचा समावेश सोडतीमध्ये झाल्यास घरांची संख्या 8 हजार 900 हुन अधिक होईल.