घाटकोपरमध्ये वाढदिवस साजरा करताना अपघात, १० जखमी

घाटकोपरमध्ये गोळीबार रोडवर असलेल्या एका घरातील पोटमाळा कोसळल्यानं अपघात झाला. 

Updated: Sep 23, 2017, 01:21 PM IST
घाटकोपरमध्ये वाढदिवस साजरा करताना अपघात, १० जखमी title=

घाटकोपर : घाटकोपरमध्ये गोळीबार रोडवर असलेल्या एका घरातील पोटमाळा कोसळल्यानं अपघात झाला. 

या घटनेत दहा लोक जखमी झाले असून यातील सर्वाना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. सहा जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. तर चार जणांवर उपचार सुरुयत. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. 

पोटमाळ्यावर भाड्यानं राहणारे बाजीराव सकपाळ यांच्या सुजल सकपाळ या बारा वर्षाच्या मुलाचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त तेथील पंधरा ते वीस माणसे या पोटमाळ्यावर जमली होती. त्यांच्या वजनानं अचानक हा पोटमाळा खाली आला. 

खालचे दुकान बंद असल्यानं जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले होते.