Naga Chaitanya Thandel Pakistan Connection : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा 'थंडेल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 35 कोटींची कमाई केली. त्यामुळे त्याला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतोय याचा एक अंदाज आला आहे. या चित्रपटाची पटकथेची देखील स्तुती करत आहेत. पण तुम्हाला माहितीये का की त्याचं एक कनेक्शन हे अल्लू अर्जुनशी जोडलेलं आहे.
खरंतर, हा चित्रपट बनण्याचं कारण हा अल्लू अर्जुन ठरला आहे. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदू मोंदेती यांनी केलं आहे आणि त्या चित्रपटाची निर्मिती ही अल्लू अरविंद यांनी केली आहे. एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाची प्रेरणा तेव्हा मिळाली जेव्हा एक पाकिस्तानी जेलरनं भारतीय मच्छीमाऱ्यांकडून अल्लू अर्जुनचा ऑटोग्राफ मागितला होता. ही घटना तेव्हा घडली जेव्हा भारताचे 22 मच्छिमार हे चुकून पाकिस्तानची सीमा ओलांडून गेले होते आणि तिथे त्यांना 13 महिन्यांपर्यंत बंद करुन ठेवण्यात आलं होतं.
जेव्हा निर्माते बनी वास यांना या घटनेविषयी कळलं तेव्हा त्यांनी या सगळ्यावर अभ्यास केला. तेव्हा त्यांना कळलं की मच्छिमाऱ्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात एका जेलरनं त्यांना मदत केली होती. पण त्यांची एक विचित्र अशी अट होती की ते अल्लू अर्जुनचे मोठे चाहते होते आणि त्यांनी मच्छिमाऱ्यांना सांगितलं की अल्लू अर्जुनचा ऑटोग्राफ पाठवा. असं म्हटलं जातं की जेव्हा सगळे मच्छिमार हे भारतात परतले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानी जेलरला दिलेलं वचन हे पूर्ण केलं.
त्या माच्छिमाऱ्यांनी ही गोष्ट अल्लू अर्जुनपर्यंत पोहोचवली आणि त्याचा ऑटोग्राफ मिळाला. जेव्हा अल्लू अरविंद यांना या गोष्टीविषयी कळलं तेव्हा हे कळलं की त्यांनी या विषयला घेऊन चित्रपट बनवण्याचं ठरवलं आणि 'थंडेल' च्या स्क्रिप्टवर काम करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे हे देखील कळलं की अल्लू अर्जुनचे चाहते हे फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत.
हेही वाचा : कोण आहे आरुषी निशंक? भारताच्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या लेकीची 4 कोटींची फसवणूक
'पुष्पा' चित्रपटात मंगल सीनूची भूमिका साकारणारा अभिनेता सुनीलनं एक किस्सा सांगत उल्लेख केला होता की स्पेनमध्ये काही पाकिस्तानी लोकांनी त्याला ओळखलं आणि त्याची मदत केली होती. सुनीलनं सांगितलं की एकदा जेव्हा रात्री स्पेनमध्ये तो जेवण कुठे करायचं हे शोधत होता तेव्हा एक रेस्टॉरंट तर बंद झालं होतं. पण तिथल्या मालकानं त्याला ओळखलं आणि चित्रपटातील सीन पुन्हा पाहून तो सुनीलचं आहे ना हे निश्चित केलं. त्यानंतर रेस्टॉरंट पुन्हा सुरु केलं आणि त्याच्यासाठी जेवण बनवलं. त्यामुळे अल्लू अर्जुनची फक्त भारतात नाही तर परदेशात किती चाहते आहेत याची जाणीव ही नक्कीच झाली आहे.