मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन

मुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Updated: Oct 20, 2024, 07:21 PM IST
मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन title=

Mumbai Landowners: Dream City ... सपनों का शहर... अशी मुंबईची ओळख. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा बोलबाला जगभरात आहे.  भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक श्रीमंत व्यक्ती मुंबईत राहतात. सध्याच्या घडीला मुंबईत छोटासा तुकडा खरेदी करणे  पण तुम्हाला माहित आहे का मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन. जाणून घेऊया.

हे देखील वाचा... मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपती

मुंबई शहर हे भारताचे आर्थिक केंद्रबिंदु आहे. मुंबईत जमीनीचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईतील जमिनीचा मोठा भाग काही जमीनदार आणि खाजगी ट्रस्टच्या मालकीचा असल्याचे एका अहवालातुन समोर आले आहे,  मुंबईतील 10% पेक्षा जास्त जमीन काही खास जमीन मालकांच्या मालकीची आहे. यापैकी बऱ्याच जमीन मालकांकडे पिढ्यानपिढ्या आलेल्या जमिनी आहेत. या जमीनी  कौटुंबिक मालमत्ता तसेच वारशाने मिळालेल्या आहे. तर काही सरकारने वेळोवेळी अधिग्रहित केल्या आहेत. 

हे देखील वाचा... पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का?

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) एक सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील एकूण जमिनीपैकी सुमारे 20% जमीन काही विशिष्ट जमीन मालकांच्या मालकीच्या आहेत. या सर्वेक्षणानुसार, मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये 1 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहेत.  त्यापैकी 34,000 एकर जमीन राहण्यायोग्य आहे. या 34,000 एकरांपैकी सुमारे 20% जमीनीची मालकी ही 9 खाजगी संस्था, कुटुंबे आणि काही खाजगी ट्रस्ट यांच्याकडे आहे. या 20 टक्क्यांपैकी निम्म्याहून अधिक जमीन मुंबईतील विक्रोळी भागातील गोदरेज कुटुंबाची आहे.

गोदरेज प्रॉपर्टीज पहिल्या स्थानी

गोदरेज परिवार मुंबईतील  सर्वात मोठा जमीनदार असल्याचे समजते.  गोदरेज प्रॉपर्टीजच्या नावावर विक्रोळी परिसरात 3,400 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) लगत हा जमीनीचा मोठा तुकडा आहे. साबणापासून ते गृहोपयोगी वस्तू तसेच रिअल इस्टेटपर्यंत गोदरेज समूहाचा व्यवसाय  विस्तारलेला आहे. यांनी नुकताच दोन भागांमध्ये विभागण्याचा करार केला. आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज यांनी गोदरेज इंडस्ट्रीज राखून ठेवली, तर त्यांचे चुलत भाऊ जमशेद आणि स्मिता यांनी मुंबईत अनलिस्टेड गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्या उपकंपन्यांसह प्रमुख मालमत्ता वारशाने मिळवल्या आहेत.

FE दिनशॉ ट्रस्ट दुसऱ्या स्थानी

जमीनीच्या मालकीच्या बाबतीत FE दिनशॉ ट्रस्ट दुसऱ्या स्थानी आहे. FE दिनशॉ ट्रस्ट  मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची जमीन मालक आहे. दिनशॉ ट्रस्टच्या नानावर 683 एकर जमीन आहे.  मालाड आणि आसपासच्या परिसरात FE दिनशॉ ट्रस्टची जमीन आहे. EF दिनशॉ यांचा 1936 मध्ये मृत्यू झाला. ते पारशी वकील आणि जमीनदार होते. 

प्रतापसिंह वल्लभदास सुर्जी कुटुंब तिसऱ्या क्रमांकावर

प्रतापसिंह वल्लभदास सुर्जी यांचे कुटुंब मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जमीन मालक आहेत. मुंबईतील भांडुप परिसरात आणि आसपासच्या परिसरात त्यांच्या नावावर 647 एकर जमीन आहे.ॉ

जीजीभॉय अर्देशीर ट्रस्ट

जीजीभॉय अर्देशीर ट्रस्ट चौथ्या स्थानी आहे. यांच्या नावे मुंबईच्या चेंबूर परिसरात 508 एकर जमीन आहे.

ए.एच. वाडिया ट्रस्ट

ए.एच. वाडिया ट्रस्ट यांच्या नावे  कुर्ला परिसरात 361 एकर जमीन आहे.

बायरामजी जीजीभॉय ग्रुप

बायरामजी जीजीभॉय ट्रस्टच्या नावावर मुंबईच्या विविध भागात 269 एकर जमीन आहे. सर बायरामजी जीजीभॉय यांना 1830 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून 12,000 एकर जमीन मिळाली होती. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथं राहतात 60 करोडपती; इतकी कमाई करतात, यांचा व्यवयास काय?