Walmik Karad Wife Statement : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बीड कोर्टाने वाल्मिक कराडला 7 दिवसांसाठी SIT च्या ताब्यात दिले आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून राज्यातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते समोर आले आहेत. अशात माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करण्यात येत असल्याचा आरोप करत वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड आक्रमक झाली आहे.
माझ्या नवऱ्याला न्याय कसा मिळणार हे तुम्हीच मला सांगा. जे काही चालल आहे ते सगळं बंद करा. तुम्ही मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याचा गोष्टी बाहेर काढल्यात. मी पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याचा गोष्टी बाहेर काढल्यात त्यांचे त्यांचे काय पराक्रम आहेत. ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मीडियासमोर आणून दाखवणार आहे. आज सुरेश धस, संदीप सोळुंके, संदीप श्रीरसागर, बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांच्या काही गोष्टी मी मीडियासमोर आणणार आहे. त्या सुद्धा तुम्हाला जनतेला दाखवावा लागेल. त्यांनी जशा गोष्टी शोधून काढल्या तशा मी पण त्यांचा गोष्टी शोधून काढल्या आहेत. माझ्या वकिलाच्या मदतीने या मी तुमच्यासमोर आणणार आहे.
बरंजर सोनावणे यांनी आज सकाळीच म्हटलं की परळला दोन दोन मंत्रीपद कसे मिळालेत. ही सोनावणे यांची पोटदुखी आहे. याच पोटदुखीमुळे त्यांनी माझ्या नवऱ्याचा वापर करुन बळीचा बकरा केलाय. मी देखील मराठा असून माझ्यावर अन्याय होतोय मला देखील न्याय द्या. अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केलीये. सुरेश धस,संदीप क्षीरसागर,खासदार बजरंग सोनवणे आणि अंजली दमानिया यांचे कारनामे लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील मंजिली कराड यांनी दिलाय.
माझ्या नवऱ्याचा केवळ राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी उपयोग करून घेतला. मात्र आता आमच्यावर वेळ आल्यानंतर काहींनी आमची साथ सोडली, असे वक्तव्य मंजिली कराड यांनी केले. त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, याबद्दल आता चर्चा सुरू आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जरांगे पाटील मस्साजोगला गेले. मी ही मराठा समाजाची आहे. माझ्यावरही अन्याय झाला आहे. मी कुणाकडे न्याय मागू? मी देखील समाजाची घटक आहे, महिला आहे. जरांगे पाटील यांच्याकडे मी न्याय मागते आहे, असे मंजिली कराड म्हणाल्या. मी मराठा आणि वंजारी समाजाची महिला आहे. हे लोक मराठा आणि वंजारी समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका, असे आवाहन मंजिली कराडने केले.