Viral News : हिंदी चित्रपटात लाजेल अशी विचित्र आणि नात्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थिती करणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील या बातमीने सर्वांची झोप उडवली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील चमरौआ भागात राहणाऱ्या एका वडिलाने मुलासाठी मुलगी पाहण्याच ठरवलं. मुलासाठी ते विकासखंड सैदनगर भागात राहणाऱ्या भावी सुनेला पाहण्यासाठी बापलेक गेले. मुलासाठी सून संपत पडली म्हणून त्यांनी लग्न ठरवलं. आता लग्न ठरलं म्हटल्यावर नवरा मुलगा नवरी मुलीला भेटायला जायला पाहिजे ना. पण इथे चित्र उलटच होतं, सासरा मुलाच्या होणाऱ्या सासुरवडीला वरच्या वर जाऊ लागला. मुलाच्या घरी सर्वांना ही बाब खटकत होती. मुलाने आणि त्याचा कुटुंबियाने वडिलांना तिथे जाण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हा सगळा प्रकार दोन वर्ष सुरु होतो.
एवढंच नाही तर रोखल्यानंतरही सासरा मुलाच्या सासुरवडीला अनेक दिवस राहायला गेला. ज्येष्ठ व्यक्ती त्यात आपल्या मुलीचा होणारा सासरा म्हणून होणाऱ्या सुनेच्या घरच्यानी त्याला विरोध दर्शविला नाही. पण एक महिन्यापूर्वी मुलाने वडिलांना जबरदस्ती आपल्या घरी आणलं आणि घरात कोंडून ठेवलं. वडिलांनी परत होणाऱ्या सुनेच्या घरी जाऊ नयेत म्हणून आईला पहाऱ्यावर बसवलं खरं पण तरीदेखील ते पळून गेले. घरातून पळ गाठल्यावर त्या म्हाताऱ्याने होणाऱ्या सुनेचं घर पुन्हा गाठलं. अशा परिस्थितीत मुलाने परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी घरात भांडण झाल्यामुळे वडील तुमच्याकडे आलेत असं सासुरवाडीत सांगितलं. त्यामुळे तेही काही न बोलता त्यांना राहण्यास त्यांनी आक्षेप घेतला नाही.
पण त्यानंतर घरात जे काही घडलं त्यानंतर दोन्ही कुटुंबात भूकंप आला. होणारा सासरा आणि होणाऱ्या सुनेमध्ये शारीरिक संबंध ठेवताना बघितल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलाच्या कुटुंबियांना कळवलं. पण मुलगा आणि त्याची आई मुलीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच सासरा आपल्या सुनेला घेऊन तिथून पळून गेला होता. दोन्ही कुटुंबियांनी या दोघांचा खूप शोध घेतला आणि नंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.