Video : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर घडला धक्कादायक प्रकार; एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या

Mumbai News : पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला आहे. दोन लोकल एकाच ट्रॅकवर समोरा समोर आल्या.

वनिता कांबळे | Updated: Jan 15, 2025, 08:10 PM IST
Video : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर घडला धक्कादायक प्रकार; एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या title=

Western Railway : लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफालाईन आहे. रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलच्या वेळापत्रकानुसार मुंबईकर धावतात. लोकलची वाहतूक अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असते.  मात्र,   मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे.  एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरा रोड रेल्वे स्टेशनजळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे,  एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्याची घटना घडली. मुंबईत पहिल्यांदाच अस काही तरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरामुळे प्रवाशी मात्र गोंधळून गेले. 

नेमकं काय घडलं?

दादरकडून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मिरा रोड रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एकच रेल्वे ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन आल्या.  ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे काही मीटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

वसई रेल्वे स्थानकावर RPF जवानाचा एका प्रवाशाने चावा घेतला. डहाणू लोकल सकाळी वसई रेल्वे स्थानकावर पोहोचली असता यावेळी आरपीएफ जवानांची एक टीम स्थानकावर तैनात होती....दिव्यांगाच्या डब्यात एक प्रवासी बसला होता त्याला आरपीएफ जवानांनी खाली उतरण्यास सांगितलं.मात्र तो हुज्जत घालत होता.या दरम्यान एक जवान डब्यात चढला आणि त्याला खाली उतरवंलं. याच  रागाच्या भरात आरपीएफ जवानाच्या हातावर प्रवाशाने जोरदार चावा घेतला आणि स्थानकावर धक्का बुक्की केली ... अखेर त्याला उचलून रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.