Pune News : पुण्यात एक धावता ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या समाधान चौकातील रोडच्या मध्यभागी असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात हा ट्रक पडून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. अखेर तीन ते साडे तीन तासानंतर हा टँकर बाहेर काढण्यात यश आले आहे.
पुण्यात रस्ता खचून खड्ड्यात पडलेला टँकर तीन तासांनंतर बाहेर काढला आहे. दोन क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढण्यात यश आले आहे. पुणे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात महापालिकेचा एक टँकर पडला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र, या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली. सिटी पोस्टाच्या आवारात जुनी विहीर असण्याची शक्यता आहे.. अशी माहिती इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी दिली.
Pune | पुण्यात धावता ट्रक खड्ड्यात पडला; CCTVत कैद झालं घटनेचं दृश्य#pune #accidenet #zee24Taas pic.twitter.com/cV9S6DlcZk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 20, 2024
मुंबईतील प्रभादेवी भागातील रस्ता पुन्हा खचलाय.. गणेसोत्सव काळात याच रस्त्यावर भलंमोठं भगदाड पडलं होतं... महानगर पालिकेकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र हाच रस्ता पुन्हा त्याच ठिकाणी खचलाय.. त्यामुळे पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागलीये.. यामुळे प्रभादेवी परिसर जलमय झालाय.. दरम्यान वारंवार रस्ता खचत असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय.. खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत या प्रकरणी निषेध नोंदवण्यात आलाय..
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिहेरी अपघात झालाय. ट्रक, टँकर आणि कारची एकमेकांना धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोगं गंभीर जखमी झालेत.. पनवेलजवळील भाताण बोगद्याजवळ ही दुर्घटना घडलीये.. या अपघात एवढा भीषण होता की यात कारचा चक्काचूर झालाय.
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी गुहागरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जवळपास १५ जणांच्या टोळक्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. ट्रकने एसटी बसला डीवायडरच्या बाजूला दाबल्यानं याचा जाब विचारायला गेलेल्या चालकास या टोल नाक्यावरील व्यक्तीने सर्वप्रथम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बसेच्या वाहकाला देखील या टोळक्याने मारहाण करुन शिव्या देत धमकी दिल्याचे या बसचे वाहक प्रवीण भगवान नांगरे यांनी सांगितले
टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दीच्या घटनेनंतर एसटीचे चालक आणि प्रवासी भयभीत, व्हिडीओ व्हायरल..झालाय ...यानंतर रात्री उशिरा चालकाने खेडशिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती..