Ratnagiri Kolhapur Amba Ghat : छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्यशाली इतिहासावर आधारित छावा चित्रपट सध्या चांगलाच चर्तेत आहे. औरंगजेब विरोधात लढा देण्याची रणनिती आखण्यासाठी संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते. संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराजांवर हल्ला केला. मुघलाचे सैन्य कोकणातील आंबा घाटातून संभाजीराजेंपर्यत पोहचले. हाच आंबा घाट महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संगमेश्वरमध्ये थांबलेले संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले. कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनीच औंरगजेबच्या सैन्याला कोकणातील ही छुपी वाट दाखवली. संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे कैद करुन कराड, वादुस, दहिवडी, फलटण, बारामती, कुरकुंभ, दौंड मार्गे पेडगावच्या किल्ल्यात आणले. छावा चित्रपटामुळे कोकणातील आंबा घाट देखील चर्चेत आला आहे.
आंबा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटरस्ता आहे. आंबा घाट हा रत्नागिरी कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडतो. डोंगरमधून जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. रत्नागिरी कोल्हापूर हा चार तासांचा प्रवास आंबाघाटामुळे आल्हाददायी बनतो. आंबा घाट हे रत्नागिरी आणि कोल्हापूर मधोमध एक छुप हिल स्टेशन आहे.
आंबा हे ठिकाण कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे 65 किमी आणि रत्नागिरीपासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.आंबा घाट हे लोकप्रिय हिल स्टेशन देखील आहे. आंबा घाटातील अनेक गावांमध्ये पर्यटक थांबातात आणि येथील निसर्गसौंदर्यचाा आनंद लुटतात. मात्र, आंबा गाव सर्वात लोकप्रिय आहे. आंबा घाट हा समुद्रसपाटीपासून 2000 हजार फूट उंचीवर आहे. हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. घाटात नेमही धुकं असत. यामुळे आंबा घाटातून प्रवास करताना प्रवाशी हमखास घाटात थांबून फोटो काढतात. आंबा घाट हा अतिशय सुंदर आहे. हिरवेगार डोंगर रस्त्याच्या भोवताली खोल दरी आहे.