Top 100 Dishes in the World : जगभरातील प्रेक्षणीय स्थळांसह तिथे बनणारे विविध पदार्थ देखील तितकेच लोकप्रिय असतात. बरेच पदार्थ हे त्या ठिकाणा वेगळी ओळख निर्माण करुन देतात. जगातील टॉप 100 टेस्टी पदार्थांची यादी प्रसिद्ध झाली आहे. जगातील टॉप 100 टेस्टी पदार्थांच्या यादीत महाराष्ट्रातील काही लोकप्रिय पदार्थांना देखील स्थान मिळाले आहे. जाणून घेऊया हे पदार्थ कोणते.
जगातील टॉप 100 सर्वाधिक आवडलेल्या पदार्थांपैकी चार पदार्थ भारतीय आहेत. यातील दोन पदार्थ हे टॉप 50 मध्ये आहेत. जगभरातील खवय्याना हे पदार्थ आवडले आहेत. जगातील पहिल्या 100 ठिकाणांमध्ये पंजाबचा समावेश पहिल्या 10 मध्ये आहे.
भारतातील बटर चिकन हा जगभरात आवडीने खाल्ला जाणार पदार्थ आहे. बटर चिकन हे जगातील टॉप 100 टेस्टी पदार्थांच्या यादीत 29 व्या स्थानावर आहे. हैद्राबादी बिर्याणी हा पदार्थ 31 व्या स्थानावर आहे.
कोलंबियाईची प्रसिद्ध डिश लेचोना ही जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. हा पदार्थ गातील टॉप 100 टेस्टी पदार्थांच्या यादीत सर्वात अग्रस्थानी आहे. इटलीचा पिझ्झा नेपोलेताना हा दुसऱ्या स्थानी तर ब्राझीलच्या पिकान्हा (बीफ) हा पदार्थ तिसऱ्या स्थानावर आहे.
खास पंजाबी फ्लेवर्स पदार्थांना या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. जगातील टॉप 100 टेस्टी पदार्थांच्या यादीत पंजाब सातव्या स्थानावर आहे. टेस्ट ॲटलसनुसार, अमृतसरी कुलचा, टिक्का, शाही पनीर, तंदूरी मुर्ग आणि पंजाबचे साग पनीर यांची चवीने जगभरातील खवय्यांना वेड लावले आहे.
या यादीत भारतातील पश्चिम बंगाल 54 व्या क्रमांकावर आहे. चिंगरी मलाई करी, शोरसे इलिश, रस मलाई आणि काठी रोल सारखे खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. दक्षिण भारत 59 व्या क्रमांकावर आहे. येथील इडली, डोसा, रस्सम हे साऊथ इंडियन पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत.
जगातील टॉप 100 टेस्टी पदार्थांच्या यादीत महाराष्ट्रीयन पदार्थांना देखील खास स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रीयन पदार्थ या यादीत 41 व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची स्पेशल डिश असलेला मिसळ पाव टेस्टी पावभाजी यासह आमरस आणि श्रीखंड हे पारंपारिक पदार्थ जगभरातील पर्यटक आवडीने खातात.