Maharashtra Crime : राजकारणाचा 'बिहार' पॅटर्न? ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण अन् ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

Nanded Crime : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केलं पण त्यानंतर ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

नेहा चौधरी | Updated: Dec 14, 2024, 10:43 PM IST
Maharashtra Crime : राजकारणाचा 'बिहार' पॅटर्न? ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण अन् ड्रॉयव्हरमुळे चार तासात... title=

Nanded Crime : लोकप्रतिनिधी असो की त्यांचे नातेवाईक यांचं अपहरण करुन हत्येच्या घटनांमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालीय. या दोन घटना ताज्या असतानाच नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुखाचं अपहरण करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे अपहरणाच्या घटनांमुळे मराठवाडा हादरलाय. (Maharashtra Nanded Crime Thackeray group shiv sena kidnap gaurav kotgire)

रात्रीचे 9 वाजता, एका गॅरेजमध्ये गाडीची दुरुस्ती सुरु आहे. त्या ठिकाणी पाच ते सहा तरुण आलेत. त्यांच्याकडून एकाला चाकूचा धाक दाखवून चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आलंय. हा थरारक प्रसंग आहे, नांदेडमधील. 
नांदेडच्या बाफना परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचं काही जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलं. मात्र,ड्रॉयव्हरमुळे पुढचा अनर्थ टळलाय. अवघ्या चार तासात त्यांची सुखरूप सुटका झालीये.

पोलिसांकडून तपास सुरू झाल्याचं कळताच अपहरणकर्त्यांनी गौरव कोटगिरेंना जवळपास 40 मिनिटांनी सोडून दिलंय. मात्र त्यांना धमक्या दिल्याचा आरोप कोटगिरेंनी केलाय.

गौरव कोटगिरे यांनी याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध इतवारा पोलिसांत तक्रार दाखल केलीये.. पोलिसांकडून सदर गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता नांदेडमधील या घटनेमुळे मराठवाडा हादरलाय. अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतायेत.

ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे अपहरण झाल्या नंतर शिवसैनिक पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोहा येथील एका शिवसैनिकाचे अपहरण करून त्याचे बोटे छाटण्यात आली होती. तशीच पुनरावर्ती आज झालेली आहे.पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोटगीरे यांचा जीव वाचला.परंतु प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे.असा आरोप ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केला आहे.