संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल सापडले, मारहाण करतानाचे VIDEO हाती; दमानियांची पोस्ट

बीडमध्ये अंजली दमानियांचं (Anjali Damania) धरणं आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेक-याला अटक करण्याची त्यांची मागणी आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नाही असा निर्धारही त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 29, 2024, 03:35 PM IST
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल सापडले, मारहाण करतानाचे VIDEO हाती; दमानियांची पोस्ट title=

बीडमध्ये अंजली दमानियांचं (Anjali Damania) धरणं आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेक-याला अटक करण्याची त्यांची मागणी आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नाही असा निर्धारही त्यांनी केला आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानियांचं धऱणं आंदोलन सुरु आहे. यादरम्यान अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सीआयडी चौकशीत स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले असून, त्याचा डेटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती दिली आहे. तसंच या मोबाईलमध्ये मारहाण करतानाने व्हिडीओ असून, बड्या नेत्याचा फोन गेल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. 

अंजली दमानियांच्या पोस्टमध्ये काय? 

अंजली दमानिया यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, "आताच काही माध्यमांकडून समजलं आहे की, सीआयडीने जी चौकशी केली आहे त्यामध्ये स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल सापडले आहेत. त्याचा डेटा रिकवर करण्यात आला आहे. त्यामधअये संतोष देशमुखला मारहाण करतानाचे भयानक व्हिडीओ आहेत. मारहाण होत असताना कोणी व्हिडीओ शूट करत असेल तर हे दुर्दैवी नाही तर क्रूर आहे. त्याच्यात एका बड्या नेत्याचं संभाषण आहे. हा बडा नेता कोण याचं नाव एका तासात जाहीर करता. याची माहिती बाहेर आली पाहिजे, कारण हा बडा नेता कोण हे आपल्याला माहिती आहे". 

 

अंजली दमानियांना पोलिसांची नोटीस

अंजली दमानिया यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. फरार आरोपींचा खून झाल्याचं विधान अंजली दमानिया यांनी केलं होतं. तीन आरोपींचा खून झाल्याचे पुरावे देण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. निनावी फोन आला आणि त्यामध्ये तीन आरोपींचा खून झाल्याचं सांगण्यात आलं होतं असा दावा दमानिया यांनी केला होता.त्यांच्या विधानामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यांनी संबंधीत विधानाची माहिती द्यावी आणि पुरावे सादर करण्यासाठी पोलिसांनी दमानियांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.