निलेश खरमरे, पुणे, झी मीडिया : पुण्यातील हडपसरमधील एका सोसायटीत अजब प्रकार समोर आला आहे. एका महिलेने घरात तब्बल 350 मांजरी पाळल्या आहेतृ महिलेच्या या प्रतापाने सोसायटीतील नागरिक दुर्गंधी आणि मांजरांच्या आवाजामुळे हैराण झाले आहेत. आपल्यापैकी अनेकजण सोसायटीतील अशा समस्यांना सामोरे जात असाल.
पुणे येथे हडपसरमधील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील हा प्रकार आहे. या महिलेने आपल्या घरात एक दोन नव्हे तब्बल 350 मांजरी पाळल्या आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महिला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचं नागिरकांचं म्हणणे आहे. या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
याबाबत महिलेच्या शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे आणि सोसायटीतील इतर रहिवाशांचे सुरुवातीला चांगले संबंध होते. मात्र महिलेचा हा प्रताप पाहता आणि घरातून येणारा दुर्गंध यामुळे लोकांनी जाणं टाळलं होतं. सुरुवातीला 50 मांजरी असल्याचं घरातील काम करणाऱ्या मदतनीसने सांगितलं. पण 350 घरात मांजरी असल्याच कळताच सोसायटीतील लोक हैराण झाले.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या एका अभ्यासात मांजरी आणि मानसिक विकारांमधील संबंध आढळून आला. या विश्लेषणात असे आढळून आले की, मांजरींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते.
मांजरी प्रत्यक्षात उत्क्रांती घडवत नाहीत. मांजरींमध्ये टोक्सोप्लाझ्मा गोंडी परजीवी आढळतो. मांजरींमधून कोणता विषाणू मानवांमध्ये पसरू शकतो. या परजीवीमुळे टॉक्सोप्लाज्मोसिसचा संसर्ग होतो. हे दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनाने होऊ शकते. तिथे आढळणारे परजीवी अंडी अन्न किंवा पाण्याद्वारे मांजरीच्या शरीरात पोहोचू शकतात. मांजरीच्या विष्ठेमध्ये असलेले हे परजीवी मानवांपर्यंत पोहोचू शकते.
स्किझोफ्रेनिया हा अनेक गंभीर मानसिक विकारांपैकी एक आहे. यामुळे, भ्रम, अव्यवस्थित विचार, कल्पनारम्य जगात भटकणे, विचित्र वर्तन इत्यादी लक्षणे दिसू शकतात. हा मानसिक विकार सामान्यतः ताणतणावाशी संबंधित असतो. किंवा ते अनुवांशिक आहे.
काही प्रकरणांमध्ये, रोग किंवा परजीवी, मांजरी देखील हे कारणीभूत ठरू शकतात. स्किझोफ्रेनिया लोकसंख्येच्या फक्त 1% लोकांना प्रभावित करते. काही लोक त्याबद्दल अधिक संवेदनशील असतात. परंतु त्यांना कधीही लक्षणे दिसण्यासाठी पुरेसा ताण येत नाही. मांजरींमुळे ते होत नाही, पण त्यांच्यात असलेले विषाणू कारणीभूत असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)