अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेवरचं आंदोलन करण्याची वेळ आलीय. 

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 13, 2018, 10:06 PM IST
अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन title=

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेवरचं आंदोलन करण्याची वेळ आलीय. 

अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्यानं, शिवसेनेनं जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तापी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. पिंप्री नांदू गावात वाळूचा ठेका देण्यात आला असून या ठेक्यावरून वाळूचा उपसा करताना महसूल विभाग तसंच पर्यावरण खात्याची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 

वाळूच्या उपशामुळं आजूबाजूच्या केळीच्या बागांना धोका पोचतोय, रस्त्यांची वाट लागली असून भूगर्भातील जलपातळीला धोका पोहचू लागलाय. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद वाळूमाफियांना असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.