Maharastra Politics: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Aajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी (Morning Swearing 2019) ही शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असू शकते, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं होतं. राज्यात राष्ट्रपती राजवट होती. ती उठवणे आवश्यक होते. त्यामुळे पवार यांची ती खेळी असू शकते, असं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झालाय. (sharad pawar first reaction to the controversy over early morning swearing ajit pawar and devendra fadanvis Maharastra Politics News)
जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. पहाटेच्या शपथविधीला आता 2 वर्ष झाली आहेत. कशाला तो विषय काढता, असं म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यात वादाला फुल स्टॉप दिलाय. शरद पवार यांनी कोल्हापुरमध्ये (Kolhapur News) बोलताना प्रतिक्रिया दिली.
पहाटेच्या शपथविधीच्या खेळाचे कॅप्टन राहिलेल्या अजित पवारांनी (Aajit Pawar) देखील प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता. महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी या चर्चा सुरू झाल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. तसेच आपण यावर बोलणार नाही, असंही अजित पवार यांनी आधीच म्हटलं होतं.
जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आजवर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी कारस्थान केलं होतं. आमचाही तसा समज होता. यामागे शरद पवारांचा हात होता, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलाय.
दरम्यान, जयंत पाटलांच्या खुलाश्याला आता काहीच अर्थ नाही. त्यांनी हा गौप्यस्फोट तेव्हाच का केला नाही? मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो, असं म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वादावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता हा वाद शांत होणार की आणखी पेटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.