सातारा : राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेय. पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेय. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु झालेय.
भाजप सरकराने 16 टक्के मराठा समाजासाठी आरक्षण लागू केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आव्हान देण्यात आलेय. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, मराठा आरक्षण जरी लागू झाले तरी मराठा जात प्रमाणपत्र देऊ नका किंवा त्याचे वाटप करु नका, असा स्पष्ट आदेश दिलाय. त्यामुळे हा भाजप सरकारला मोठा झटका बसलाय.
याबाबत मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी शंका व्यक्त केली. राज्यात भाजप सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेले आहे, ते न्यायालयात किती टिकेल याबाबत पवारांनी शंका व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी 102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. या तरतुदीतील मुदे सरकारने लक्षात घेतले नसावेत, अशी शंका पवार यांनी यावेळी उपस्थित केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात मोदी सरकारवर तोफ डाग लागली. गांधी कुटुंबावर मोदी यांच्याकडून जी टीका होते आहे, त्याला पवार यांनी जोरदार उत्तर दिलेय. गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या देशासाठीच्या त्यागाचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक केले.