महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वाद; थेट अजित पवारांनाच आव्हान

Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय. आक्रमक विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. त्यापुढे जात आता अजित पवारांनाच विरोधकांनी आव्हान दिलंय. एकंदरीत या प्रकरणारुन विरोधकांनी रान उठवलं असून, राष्ट्रवादी आणि खास करुन धनंजय मुडेंना पुरतं कोडींत गाठलं आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 5, 2025, 09:02 PM IST
महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वाद; थेट अजित पवारांनाच आव्हान  title=

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलं. संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अजितदादा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल धस यांनी केला. मात्र यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. महायुतीत वाद झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असतील, असा इशाराच मिटकरींनी दिलाय.

संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलं. संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अजितदादा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल धस यांनी केला. मात्र यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. महायुतीत वाद झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असतील, असा इशाराच मिटकरींनी दिलाय.

 सूरज चव्हाण यांच्या टीकेनंतर सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत चव्हाण यांचा समाचार घेतलाय. संतोष देशमुख प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे आमदारच एकवटलेत. सुरेश धस यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजितदादांकडे विरोधक बोट दाखवत आहेत. त्यामुळे बीड प्रकरणावरून महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय.