संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, देहू गावावर शोककळा

Pune News Today: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 5, 2025, 12:59 PM IST
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, देहू गावावर शोककळा title=
sant tukaram maharaj ancestors ashish more ended his life in dehu

Pune News Today: तीर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरीष महाराज मोरे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज आहेत. शिरीष महाराज यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शिरीष महाराज हे 30 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेले नाहीये. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी करत आहेत. मात्र, हभप शिरीष महाराज यांच्या आत्महत्येनंतर तीर्थक्षेत्र देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, आर्थिक विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा तर्क वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. काहीच दिवसांत त्यांचा विवाहसोहळा होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आर्थिक विंवचना हेच आत्महत्येमागचे कारण असू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शिरीष महाराज यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.