सांगली : राज्यातील कांही साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत, त्यामुळे ते कारखाने आर्थिकदृष्टया डबघाईला आले आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यात कुंडल येथील ट्रॅक्टर वितरण प्रसंगी खोत हे बोलत होते.
कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकाराने 113 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. शेतकऱ्याना प्रत्येकी एक लाख रुपये किमतीने हे ट्रॅकटर मिळाले आहेत. त्यामुळे 113 शेतकऱ्यांचे सर्वात मिळून एक कोटी तेरा लाख रुपयांची बचत झाली आहे.
साताऱ्यातील साखरवाडीमधील न्यू फलटण शुगर वर्क या साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या अकरा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. फलटणमधील प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. या साखर कारखान्याला फलटण आणि बारामती या भागातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस घातला होता. मात्र एक वर्ष झाले तरी कारखान्यानं बिलाचा एक रुपयाही दिला नाही.
वारंवार मागणी करूनही कारखान्याचे संचालक लक्ष देत नसल्यानं या शेतकऱ्यांनी फलटणमध्ये आंदोलन सुरू केलंय. पण या आंदोलनाला अकरा दिवस झाले तरी कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.