Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथील सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. 5 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना काहींचे निधन झाले. बुलडाणा येथील समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेवर ही मोठी दुर्घटना घडली. बसला आग लागल्याने बाहेर पडता न आल्याने लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.
दरम्यान, नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या विदर्भ बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या भयानक अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव खासगी बस एका खांबाला धडकल्यामुळे ती संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. त्यानंतर ती पलटी झाली आणि तिने पेट घेतला. यात बसमधील प्रवाशांचा होरळून मृत्यू झाला.
Maharashtra | A total of 33 people were travelling on the bus out of which 25 people died and 8 people sustained injuries. The driver of the bus also survived and said that the bus overturned after a tyre burst leading to flames in the bus: Buldhana SP Sunil Kadasane
— ANI (@ANI) July 1, 2023
बुलडाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर 30 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याने 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. काल रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेच्या वेळी बसमध्ये 30 प्रवासी होते, त्यापैकी 25 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले होते. टायर फुटल्याने बस पलटली, त्यानंतर बसने पेट घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. अपघाताचे कारण रस्त्यात अडथळा असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra | Several feared dead after a bus burst into flames on Samruddhi Mahamarg expressway in Buldhana: Buldhana Police pic.twitter.com/Zs6Mt0tfsT
— ANI (@ANI) July 1, 2023
या घटनेत प्रशासनाचा निष्काळजीपणाही समोर आल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर लगेचच लक्झरी बसने पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दीड तास बस जळत राहिली, मात्र अग्निशमन विभाग आणि पोलिसांचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले नाही. त्यामुळे बसमधील लोकांचा होरपळून मृत्यू झाला.