राज्यात दुर्मिळ गिया बार्रेचं संकट आलं आहे. आतापर्यंत गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली असून यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गिया बार्रेची नेमकी काय लक्षणं आहेत हे जाणून घ्या.
पुण्यावर गिया बार्रे सिंड्रोमचं संकट
गिया बार्रे आजाराचे 67 रुग्ण, 13 गंभीर
आरोग्य विभागाकडून अर्लट जारी
HMPVचं संकट अजूनही टळलं नाहीय त्यातच गिया बार्रे म्हणजेच गीयन बारे सिंड्रोमचं महाराष्ट्रात संकट आलं आहे. आतापर्यंत गिया बार्रे रुग्णांची संख्या 67 वर गेली आहे. सध्या यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून शहराच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्याची प्रकरणे आढळली आहेत. अतिसार, ताप, शरीरात वेदना अशी त्याची लक्षणं आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन आणि आरोग्य विभाग अर्लट झालं असून लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
गीयन बारे सिंड्रोम हा एक हा एक दुर्मिळ आजार आहे, जाणून घ्या या आजाराची लक्षणं.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
- स्नायु कमकुवत होतात
- हात, पायात मुंग्या येतात
- अशक्तपणा जाणवू लागतो
- बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं
- धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं
यातील कोणतीही लक्षण जाणवल्यास लगेचचं जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा
काहीं रुग्णांचे नमुने NIV कडे पाठवण्यात आले होते, त्यात या आजारासाठी कारणीभूत असलेले कंप्युलोबॅक्टर जेजुनी जीवाणू आढळून आलेत. तर हा आजार जेव्हा अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतं. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते असं तज्ञांचं मत आहे.
गिया बार्रे होण्याची विविध कारणं आहेत. जसं की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे या गोष्टी आजाराला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. सिंहगड रोडवरील किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदोशी, कोल्हेवाडी, धायरी आदी गावांना विहिरीतून पाणीपुरवठा होतो. धरणातून आलेलं पाणी कुठलीही प्रक्रिया न करता, ब्लिचिंग पावडर मिसळून नागरिकांना दिलं जातं. त्यामुळे या विहिरीतील दूषित पाणीच आजाराचं मूळ असल्याचं सांगितलं जात आहे.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनानं कृती दल स्थापन केलंय....शासन आणि प्रशासनाकडून GBS संदर्भात उपाययोजना राबविण्यात येत आहेत...या आजाराच्या काळात स्वतः रुग्ण आणि त्याचे नातेवाईक प्रचंड मानसिक तणावातून जात असतात. मात्र, सुयोग्य उपचार मिळाले, रुग्णाने मानसिक स्थिती खंबीर ठेवली, तर तो किंवा ती आजारातून संपुर्णतः दुरुस्त होतो त्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा