म्हणून लोणार सरोवराचं पाणी गुलाबी झालं

जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या बुलढाणाच्या लोणार सरोवराचं पाणी अचानक गुलाबी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Jun 11, 2020, 06:08 PM IST
म्हणून लोणार सरोवराचं पाणी गुलाबी झालं title=

बुलढाणा : जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या बुलढाणाच्या लोणार सरोवराचं पाणी अचानक गुलाबी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोणार सरोवराचं पाणी गुलाबी व्हायचं शास्त्रीय कारण आता समोर आलं आहे. लोणार सरोवरात उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाने, सूर्यप्रकाशाने आणि अपुऱ्या पावसाळी पाण्याने बिटा कॅरोटीन रंगद्रव्य तयार होऊन पाणी गुलाबी रंगाचे झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर उल्कापाताने निर्माण झालेलं बेसाल्ट खडकाचे आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. या सरोवरात असलेले पाणी मूळात क्षारयुक्त, खारे असले तरी सरोवरात क्षारयुक्त पाणी आणि गोड पाणी असे दोन प्रवाह आहेत. हीच या सरोवराची वैशिष्ट्ये आहेत. लोणार सरोवराचे पाणी आजवर कधीही गुलाबी झाले नव्हते.