विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viral

Maharashtra Teacher Viral Video : एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 7, 2024, 01:14 PM IST
विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viral

एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सांगितलं जातंय की, शिक्षकाने मुलाला वर्गात माहराण केली. पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर झालं असं की, शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्गात मारहाण केली. विद्यार्थ्याने शाळेचा युनिफॉर्म इन न केल्यामुळे शिक्षक रागावले आणि त्यांनी मुलाला बेदम मारहाण केली. शिक्षक या घटनेने अतिशय रागावले आणि मारहाण केली. या घटनेचा विद्यार्थ्यांच्या जवळच्यांनी निषेध करत तक्रार स्वागरेट पोलीस ठाण्यात दाखल केली. 

पीडित विद्यार्थी 11 वर्षांचा असून सहावीत शिकत आहे. 27 सप्टेंबर रोजी कॉम्प्युटरच्या शिक्षक वर्गात शिकवण्यासाठी गेले. शिक्षक संदेश भोसले वर्गात गेले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्याला शर्ट इन न करण्याचं कारण विचारलं. तेव्हा विद्यार्थी शांत राहिला काहीच बोलला नाही. पण शिक्षकांनी मुलाची मारहाण करण काही थांबवलं नाही. विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

असं म्हटलं जातंय की, शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. याबाबत शाळेत तक्रार करुनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली. मनसे कार्यकर्त्यांनी कुटुंबियांसोबत पोलिसात तक्रार केली तेव्हा FIR दाखल करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. 

हा व्हिडीओ पाहून पालक आणि मनसे कार्यकर्ते हैराण झाले. त्यांनी पोलिसांच्या समोरच शिक्षकाला मारहाण केली. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थितीने हे प्रकरण शांत झालं.