'मुलगा न सांगताच निघून गेला आणि...' बेपत्ता मुलाबद्दल काय म्हणाले तानाजी सावंत?

Tanaji Sawant: . ऋषिराज सावंत असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2025, 09:11 PM IST
 'मुलगा न सांगताच निघून गेला आणि...' बेपत्ता मुलाबद्दल काय म्हणाले तानाजी सावंत? title=
तानाजी सावंत

Tanaji Sawant: शिवसेनेचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आलंय. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.सिंहगड रोड परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे माजी आरोग्य मंत्री आहेत. ऋषिराज सावंत असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

काय म्हणाले पोलीस?

तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार आम्हाला फोनवरून मिळाली होती. त्यानंतर सिंहगड पोलीस स्टेशन ला किडनॅपिंगची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याने पुणे विमानतळावर वरून उड्डाण केल्याची माहिती आहे. फ्लाईटचे लोकेशन कळले आहे. त्याला सुखरूप परत आणलं जाणार असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. 

याला बेपत्ता म्हणता येणार नाही- तानाजी सावंत

याला अपहरण किंवा बेपत्ता असं काही म्हणता येणार नाही. मुलगा न सांगताच निघून गेला. त्याला विमानतळावर सोडल्याचे ड्रायव्हरने सांगितले. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. पण काहीच न बोलता गेला त्यामुळे मी अस्वस्थ झालो, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.