हा माज येतो कुठून! पुण्यात तरुणाकडून पोलिसाला मारहाण, Video Viral

Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 12, 2025, 07:39 AM IST
हा माज येतो कुठून! पुण्यात तरुणाकडून पोलिसाला मारहाण, Video Viral title=

Pune News Today: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांत वाढ झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर हल्ला करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मगरपट्टी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. युवकाकडून भररस्त्यात पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. 

पुण्यातील मगरपट्टा परिसरात तरुणाकडून पोलिसाला मारहाण करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान स्थानिकांनी युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे दिले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा नशेत असून मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारत होता. दरम्यान, या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांनी त्या तरुणाला हाटकले.

वाहतूक पोलिसांनी हटकले असता त्याला राग अनावर झाला त्यामुळं तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यानंतर जमावाने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागिकांकडून आ घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसंच, इतका माज येतो कुठून असा सवालही करण्यात येत आहे. 

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच जामिनावर सुटलेल्या एका नामचीन गुंडाची भव्य रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे पुण्यात गुंड - बदमाश बिनधास्त आणि सामान्य नागरिक भयभीत असं चित्र सध्या आहे.