Gujarat Animal Welfare Board: राजकोटमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला. या उंदरांचा उपद्रव इतका झालाय की रुग्णांनाही त्यांनी सोडलं नाही, रुग्णांना उंदीर चावल्याच्याही घटना घडल्यात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं पिंजरे लावून उंदीर पकड पकडले. उंदरांना पकडणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असून कारवाई का करु नये? अशी नोटीस आल्यानं हॉस्पिटल प्रशासनही चकीत झालंय.उंदरांच्या चाव्यानं रुग्ण त्रस्त, तरीही उंदरांना पकडणं गुन्हा आहे का? रुग्णांना चावणाऱ्या उंदरांना पकडणं म्हणजे रुगणालय प्रशासनाचा अत्याचार आहे का? पिंज-यातले उपद्रवी उंदीर बिचारे आहेत? रुग्णालय प्रशासन गुन्हेगार आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत.
गुजरातच्या प्राणी कल्याण मंडळाने राजकोटमधल्या सरकारी रुग्णालयाला एक नोटीस पाठवलीय. हॉस्पिटलमध्ये उंदरांना पकडलं असल्यास, तुम्ही उंदरांवर अत्याचार करत आहात. उंदरांना पिंजराबंद केल्याने IPCच्या 428, 429 कलमांतर्गत रुग्णालयावर कारवाई का करु नये? असे नोटीस मध्ये म्हटलंय.
राजकोटमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला. या उंदरांचा उपद्रव इतका झालाय की रुग्णांनाही त्यांनी सोडलं नाही, उंदीर रुग्णांना चावल्याच्याही घटना घडल्यात, त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं पिंजरे लावून उंदीर पकड पकडले आणि प्राणीमित्रांकडून कारवाईच्या नोटीसीचं हेच कारण ठरलं. उंदरांना पकडणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार असून कारवाई का करु नये अशी नोटीस आल्याने हॉस्पिटल प्रशासनही चकीत झालं.
विशेष म्हणजे या सरकारी नोटीसीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहितीच नाही. खरं तर सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाचे पदसिध्द अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात मात्र जिल्हाधिकारीच अनभिज्ञ आहेत. तर ही नोटीस प्राणीप्रेमी आणि अॅनिमल वेलफेअर बोर्डचे सदस्य राजेंद्र शाह यांनी जारी केल्याचं पुढे आलंय.
तर या नोटीसीला उत्तर देताना या उंदरांना कुठलीही हानी पोहचवणं नव्हे, तर रुग्णांना उंदरांपासून वाचवणं हे प्राथमिक कर्तव्य असं म्हटलंय. आणखी कोणाला उंदरांकडून इजा होऊ नये यासाठी नदीत सोडलं जातं.या उंदरांना कुठलीही हानी पोहचवणं नव्हे, तर रुग्णांना उंदरांपासून वाचवणं हे प्राथमिक कर्तव्य असल्याचं उत्तर दिलंय. पुढे हे उंदीर आणखी कोणाला इजा करु नये यासाठी त्यांना पिंजराबंद करुन नदीत सोडलं जात असल्याची माहिती दिलीय. उपद्रवी उंदरांच्या बचावासाठी प्राणी कल्याण मंडळाने सरकारी रुग्णालयाला नोटीस पाठवली खरी पण उंदीर प्रेमापोटी पाठवलेली नोटीस राज्यात हास्यास्पद घटना ठरलीयं.