गुड्ड्या हत्या प्रकरणात एकाला अटक

धुळ्यातील बहुचर्चीत गुंड गुड्ड्याच्या हत्ये प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

Updated: Jul 22, 2017, 02:04 PM IST
गुड्ड्या हत्या प्रकरणात एकाला अटक  title=

धुळे : धुळ्यातील बहुचर्चीत गुंड गुड्ड्याच्या हत्ये प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी असं या अरोपीचं नाव आहे. त्याला आज पहाटे कामशेतमधून अटक करण्यात आली. कट्टीच्या अटकेनंतर गुड्ड्याच्या खुनाचा कट आणि त्यामागचं कारण उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याची अटक लांबवण्यासाठी धुळे शहरात अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, धुळे : धुळ्यातला कुख्यात गुंड रफियोद्दीश शेख उर्फ गुड्ड्याचा निर्घुण खून करणाऱ्या मारेकऱ्यांना चार दिवस उलटल्यानंतरही मार्ग सापडेना त्यामुळे आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा हजार ते ५० हजारांचे रोख बक्षीस जाहीर केलं होतं.

१८ जुलैला कुख्यात गुंड गुड्ड्या याची निर्घृण हत्या झाली होती. कसायालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीने गुड्ड्याचा खातमा करण्यात आला. हे सर्व मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले होते.