Vasai Crime News: वसई पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरली आहे. वसई पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील यात्री, प्रवासी विश्रामगृहात थांबलेल्या एका गायकाची करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपीला अटक केली आहे हत्येमागे धक्कादा.क कारण उघडकीस आले आहे. या हत्याकांडामुळे लॉजिंगमध्ये थांबणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राधाकृष्ण व्यंकट रमण असं मृत गायकाचे नाव आहे. याप्रकरणी राजू शहा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोघेही रुम पार्टनर होते. पोलिसांनी आरोपी राजू शहा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे.
मृत राधाकृष्ण व्यंकटरमण हे व्यवसायाने गायक आहेत. राधाकृष्ण आठवडाभरापूर्वी वसईच्या यात्री प्रवासी गृह या लॉजच्या एका खोलीत राहण्यासाठी थांबले होते. लॉज मालकाने आरोपी राजू याला राधाकृष्ण यांच्या रूममध्ये राहायला सांगितले होते. यावेळी फोनवरून मोठ्या आवाजात बोलण्यावरून दोघांत जोरदार भांडण झाले. या रागात राजू याने राधाकृष्ण याच्या पोटात चाकु भोसकून त्यांची हत्या केली केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. माणिकपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला अटक केली आहे.
वसईमध्ये एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची छळ करून निघृण हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकणं, हात पाय बांधून विजेचा धक्का देणं, अंगावर उकळतं तेल ओतणं असे प्रकार करण्यात आले. त्यानंतर डोक्यात हातोडीचे घाव घालून त्याला ठार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र एवढ्या प्राणघातक हल्ल्यातून पती बचावला. वसई पश्चिमेकडील उमेळमानमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. भभिष्यत बुरगुहायन असं जखमी पतीचं नाव आहे. त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची पत्नी क्वीनसिया आणि तिचा प्रियकर राजेश कोटीयन यांना अटक करण्यात आलीये. विशेष म्हणजे भभिष्यत आणि क्विनसिया यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.
वसई पश्चिमेच्या बांधकाम सूरू असलेल्या इमारतीच्या ठेकेदाराच्या भावाची एका कामगाराने हत्या केल्याचा प्रकार घडला होता.
8 महिन्यांपासून ठेकेदाराने पगार थकवल्याने आरोपीने ठेकेदाराच्या भावाच्या डोक्यात लाकडी फळी घाली. अरबाज आलम असं आरोपीचं नाव असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
.