Shivraj Rakshe Govt Job: डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान शिवराज राक्षेसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला. कारण त्याच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले आहे. त्याला शासकीय नोकरी देण्यात आली आहे. डबल महाराष्ट्र केसरी जिंकत शिवराजने स्वत:सोबत नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली. सरकारी नोकरी मिळावी अशी त्याची इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. शिवराजच्या आनंदाला पारावर उरला नाही.
क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्तीनंतर शिवराज राक्षेला खूप आनंद झाला. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. आतापर्यंतचा माझा प्रवास खूप खडतर होता. त्यात मुख्यमंत्र्यांनी शासकीय अधिकारी म्हणून मला नियुक्ती पत्रक दिलं. यामुळे माझी आणि माझा कुटुंबियांची मेहनत आज सार्थ ठरली, अशा शब्दात त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. क्रिडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडुंना सरकारी नोकरीची इच्छा असते. बहुतांश जणांची ही इच्छा अपूर्ण राहते. पण शिवराला शासकीय नोकरीचे भाग्य लाभले आहे. .
शिवराज राक्षे हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील मल्ल आहे. याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवत राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. जानेवारी २०२३ मध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती. या अंतिम सामन्यात शिवराज राक्षेची लढत महेंद्र गायकवाड विरुद्ध होती. दोन्ही पेहलनाव पट्टीचे असल्याने कोण विजेता होणार? याबद्दल साशंकता होती. पण शिवराजने आपले कौशल्य पणाला लावत डबल महाराष्ट्र केसरीवर पहिल्यांदा नाव कोरले होते.
शिवराजचे वडील आणि आजोबा यांनीही पेहलवानकी केली होती. त्यांच्याकडूनच शिवराजने प्रेरणा घेतली होती. पैहलनावकीचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले होते. शिवराजने महाराष्ट्र केसरीचं मैदान मारत चांदीची गदा पटकावी, अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती. केवळ इच्छाच नव्हे तर शिवराजसाठी त्यांनी खूप मेहनतदेखील घेतली. खाण्यापिण्यापासून ते व्यायामापर्यंत कोणतीच गोष्ट त्याला कमी पडू दिली नाही. त्याचे वडील शेती आणि दुधाचा व्यवसाय करतात. दरम्यान शिवराजने आपले पेहलवानकीचे शिक्षण कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात केले. येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज तयार झाला.